शहापूर आरोग्य केंद्र नवे. 
मुंबई

शहापुरातील आरोग्याचा प्रश्न सुटणार; `या` ठिकाणी होणार नवीन आरोग्य केंद्र

राहुल क्षीरसागरः सकाळ वृत्तसेवा

ठाणे :  ठाणे जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भाग म्हणून शहापूर तालुक्‍याकडे पाहिले जाते. या भागातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळावी यासाठी शिरोळे आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य केंद्रात रूपांतर करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. या मागणीची दाखल घेत या आरोग्य केंद्र बाबतचा प्रस्ताव राज्याच्या आरोग्य विभागाकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळताच शिरोळ आणि परिसरातील 15 गावपाड्यातील 22 हजार 271 नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळू शकणार आहे. 
ठाणे जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागातील शहापूर तालुक्‍याची लोकसंख्या चार लाख 55 हजार 309 इतकी आहे. त्यानुसार या तालुक्‍यात सध्या आठ आरोग्य केंद्र, एक ग्रामीण रुग्णालय आणि एक उपजिल्हा रुग्णालय आहे. असे असले तरीही तालुक्‍यातील शिरोळ या दुर्गम परिसरात वाहतुकीच्या साधनांचा अभाव असल्यामुळे या भागातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शहापूर तालुक्‍यातील शिरोळ हे गाव अतिशय दुर्गम भागात असून या गावाची लोकसंख्या 838 इतकी आहे; तर आसपासच्या 15 गावांची लोकसंख्या 22 हजार 271 इतकी असून दिवसागणिक ही लोकसंख्या वाढू लागली आहे. या गावापासून कसारा आरोग्य केंद्रापासून 10 किमी, तर ग्रामीण रुग्णालयापासून 12 किमी आणि शहापूर उपजिल्हा रुग्णालयापासून 31 किमी लांब आहे. त्यामुळे शिरोळ गावात असणाऱ्या उपकेंद्राचे रूपांतर आरोग्य केंद्रात करण्याची मागणी येथील नागरिकांकडून अनेक वर्षापासून करण्यात येत होती. त्याचबरोबर जिल्हा परिषदेसह आरोग्य समिती यांच्याकडून देखील या भागात आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी करण्यात येत होती. 


- 4 कोटी रुपये खर्च अपेक्षित 
ठाणे जिल्ह्यात कोरोना या आजाराने थैमान घातलेले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर येथील नागरिकांकडून करण्यात येणाऱ्या आरोग्य केंद्र उभारणीच्या मागणीची दखल घेत, शिरोळ उपकेंद्राला आरोग्य केंद्र करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला. या आरोग्य केंद्रासाठी चार कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर येथे दोन वैद्यकीय अधिकारी, दोन आरोग्य सहाय्यक, सहाय्यक परिचारिका, प्रसविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, मिश्रक यांच्यासह 15 पदांची या केंद्रात आवश्‍यकता आहे. 

अंतराचे निकष शिथिल करण्याची मागणी 
सध्या शिरोळ या परिसरात 22 हजार 271 इतकी लोकसंख्या असून ही लोकसंख्या 2011 च्या जनगननेनुसार आहे. त्यात वाढत्या शहरीकरणामुळे या भागातील लोकसंख्येत वाढ होत आहे. तसेच या भागातील दोन आरोग्य केंद्रामधील अंतर 10 किमी असले तरी हा भाग अतिशय दुर्गम असल्यामुळे व कच्चे रस्ते असल्यामुळे जवळचे आरोग्य केंद्र गाठण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे 10 किमीच्या अंतराचे निकष शिथिल करून या केंद्रासाठी शासनाने योग्य निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी राजेश घनघाव यांनी केली.  

 

New health care center in Shahapur taluka 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 5 दिवसांतच 1 लाखाचे झाले 3 लाख! 300% रिटर्न देणाऱ्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल

Ganeshotsav 2026: हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी का? पूजा करण्याची योग्य वेळ कोणती? | Ganesh Chaturthi 2026

Nagpur Crime: शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाले; कर्ज फेडण्यासाठी उच्चशिक्षित तरुणाने चक्क SBI बँक लुटली, ४.५३ लाखांसह पोलिसांच्या ताब्यात

Latest Marathi News Live Update : राज्यात दुष्काळजन्य स्थिती, राज्यात ऑगस्ट महिन्यात ४६ टक्के तूट

Maratha Reservation: मनाेज जरांगे-पाटलांच्या उपोषणाला जुन्नरमधून पाठिंबा; आळेफाट्यावर मराठा समाजाचा रास्ता रोको, मुंबईकडे कूच करण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT